हशू आडवाणी विद्यालय राशीन येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस साजरा.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी) हशू आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथे दिनांक .१४.९.२०२५ रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमांमध्ये माध्यमिक विभागाचे मनोहर भारतीय सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती निवृत्त प्राचार्य श्री शर्फुद्दीन सय्यद सर आणि संस्थेचे अध्यक्ष श्री.अल्लाउद्दीन एस. काझी साहेब हे होते तसेच कार्यक्रमाचे नियोजन ज्युनिअर हिंदी विभाग प्रमुख प्रा.मुश्ताक शेख सर यांनी केले.

यावेळी विध्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र नसटे प्रा. विठ्ठल काळे सर व प्रा. साळवे सर यांनी मनोगत केले तसेच सरफुद्दीन सय्यद सर यांनी प्रवासातील हिंदी भाषेचे अनुभव सांगितले व गमतीदार किस्से सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारती सर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले आणि हिंदी भाषा सहज व सोपी भाषा आहे आणि हिंदी देशाच्या प्रत्येक राज्यात बोलली जाते व राष्ट्रीय भाषा म्हणून तिचा आपण स्वीकार केलेला आहे आणि आपण तिचा सन्मान करतो तसेच हिंदीउ साहित्यकारांची आठवण करून दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 11वी विज्ञान वर्गातील अक्षरा तोरकड व वैष्णवी टाक या विद्यार्थिनींनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा.मुश्ताक शेख यांनी केले.



