पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हशु आडवाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व व्याख्यान कार्यक्रम संपन्न


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथे महाराष्ट्रातील उत्कृष्ट मार्गदर्शक, व्याख्याते डॉ.संतोष मचाले सर यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनीना अनमोल मार्गदर्शनाने विचारांची दिशा देणारे व्याख्यानाचे धडे गिरवले या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष विद्यालयाचे समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अल्लाउद्दीन एस.काझी साहेब होते. डॉ.मचाले सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा मार्ग योग्य निवडण्यासाठी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. विचारांची दिशा अयोग्य असल्यास आयुष्याची दशा होते त्यामुळे योग्य मार्ग निवडण्याचा संदेश त्यांनी दिला.आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी ध्यासपूर्ण वाटचाल केल्यास नक्कीच यश मिळते हा महान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेंद्र नष्टे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद , पालक वर्ग व विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड श्री.यशवंत देशमुख सर तर श्री.सतीश शिंदे सर यांनी अनुमोदन दिले. तर प्रा.विठ्ठल काळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिगांबर साळवे यांनी केले.



