दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे नागपंचमीनिमित्त सर्पांविषयी जागृती व्याख्यान


दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील पर्यावरण विभागाच्या वतीने नागपंचमी सणाचे औचित्य साधून ‘सर्पांचे जीवन व विष याबाबत जनजागृती’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सर्पमित्र गोपीनाथ ढोबे यांनी मार्गदर्शन केले.

गोपीनाथ ढोबे यांनी विविध सर्पाच्या जाती, त्यांचे जीवनचक्र, सर्पदंशाचे परिणाम, तसेच सर्पांविषयी पसरलेल्या गैरसमजांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. पर्यावरण संतुलन राखण्यात सर्पांचे महत्त्व ओळखून त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. संदीप पै, डॉ. संगीता कुलकर्णी, प्रा. विठ्ठल आसवले तसेच पर्यावरण विभागाचे सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा वैभव वर्डुळे यांनी केले.



