ब्रेकिंग
राशीन ग्रामपंचायत मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लाेकाभिमुख सरपंच सौ. नीलम साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे १ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय राशीन येथे लोकशाहीर ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच राशीनच्या प्रथम लोकाभिमुख सरपंच नीलम भीमराव साळवे यांचाही वाढदिवस मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरा करण्यात आला.
यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांन च्या हस्ते नीलम साळवे यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन पेढे भरवीत मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल माेढळे, अमोल जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी उत्कर्षा शिंदे, सोनटक्के, अंबादास जाधव, दत्ता उकिरडे, संतोष ढावरे, राजेंद्र ढावरे, व इतर पदाधिकारी ,ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.