Advertisement
महाराष्ट्र

सूर्यतेज’ वतीने दीपावली-पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन…*

Samrudhakarjat
4 0 1 9 3 7
सूर्यतेज’ वतीने दीपावली-पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन…*
        कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद,अहमदनगर,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म,कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने  सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी  दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात बुधवार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० पर्यंत आयोजित केल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी पारंपारिक(ठिपक्यांची रांगोळी/संस्कार भारती रांगोळी),निसर्गचित्र(निसर्गाचा देखावा/निसर्गरम्य चित्र),व्यक्तीचित्र(व्यक्ती/प्राणी/पक्षी), सामाजिक विषय(शिक्षण/स्वच्छता/वृक्षारोपण/बेटी बचाव/शासनाच्या योजना),व्यंगचित्र(कोणत्याही प्रकारचे व्यंगचित्र) असे पाच विषय ठेवण्यात आले आहे. प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच २५ विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी नसून नाव नोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेसाठी विशिष्ठ नियम व अटी तयार केल्या असून नाव नोंदणीच्या ठिकाणी सदरचे माहितीपत्रक उपलब्ध केले आहे, स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी नियम व अटीचे वाचन आणि पालन करणे आवश्यक असून ते स्पर्धकाला बंधनकारक राहतील.नाव नोंदणीसाठी १० केंद्र ठेवण्यात आली असून स्पर्धकाचे पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर नोंदवावा. त्यानुसार नोंद घेऊन स्पर्धकाला स्पर्धेत क्रमांक नावनोंदणी अधिकारी देतील.कुटुंबातील एका सदस्याला स्पर्धक म्हणून समजण्यात येईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात स्पर्धकांना येईल. स्पर्धेच्या दिवशी साकारलेल्या रांगोळीचा नोंदणी क्रमांक टाकलेला फोटो तसेच स्पर्धकांचा रांगोळी सोबत एक स्वतंत्र फोटो नोंदणी अधिकारी यांचे व्हाट्सअप वर तसेच नोंदणी केंद्राच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवावा. स्पर्धेचे परीक्षण स्पर्धेच्या दिवशी बुधवार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०९:३० ते ०२:०० वाजेपर्यंत होईल.या संदर्भात नोंदणी अधिकारी आपणास व्हाट्सअप वर कळवतील.स्पर्धेसंदर्भात सर्व बदल,नियम,अटी,हक्क आयोजकांनी राखून ठेवल्या आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेकरिता  नाव नोंदणी : केंद्र-A गायत्री लेडिज टेलर,पगारे वाडा, बिरोबा चौक, कोपरगाव सौ. स्नेहल पगारे मो.7020912959, केंद्र-B संगीत रत्न शुक्लेश्वर मंदिर पाठीमागे, मुंजोबा मंदिर, बेट सौ.भाग्यश्री जोशी मो.8698591639, केंद्र-C शुभम अलंकार, सोमेश्वर महादेव देवस्थान समोर, सराफ बाजार, ओम कपोते मो.7498006048, केंद्र-D पांडूरंग विसपुते सराफ,बालाजी मंदिर समोर,सराफ बाजार,जयंत विसपुते मो. 9766626764, केंद्र-E अर्चना टेलर,  कोर्ट रोड, पॉवर हाऊस जवळ,अमोल शिंपी मो.7262960000, केंद्र-F श्रीनाथ किराणा, महादेव मंदिर समोर, महादेवनगर ,दिपक येवले मो.8668415074,केंद्र-G दारूवाला क्लासेस,महावीर काॅलनी,धारणगांव रोड,मतीन दारूवाला(सर)मो.9823847863,केंद्र-H साई क्लिनिक,निवारा,जुना टाकळी रोड, डॉ. निलीमा आव्हाड मो.9271538338,  केंद्र-I लक्ष्मी ॲडव्हर्टायझिंग,बस स्टॅण्ड जवळ,धारणगाव रोड (श्री.रासकरदादा ऑफिस) सौ.वनिता भसाळे मो.9765606544, केंद्र-J ब्रिलियंट ॲबेकस क्लासेस,कमलकुंज, येवला रोड,वासंती गोजारे मो.9623359605 या नोंदणी केंद्रावर स्पर्धकांनी आपली नावे नोंदवावी.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, प्रा.सौ.लताताई भामरे, प्रा.सौ.कल्पनाताई गीते,ॲड.सौ.स्मिमाताई जोशी,प्रा.मसुदा दारुवाला,प्रा.प्राजक्ता राजेभोसले,डॉ.नीलिमाताई आव्हाड,प्रा.अनिल अमृतकर,प्रा.अतुल कोताडे,,प्रा.मतीन दारुवाला,प्रा.अमोल निर्मळ,प्रा ऋतुजा कोळपकर,प्रा.वंदना अलई,प्रा.माधवी पेटकर,ॲड.महेश भिडे,प्रा.सौ.मानसी टिळेकर,दिपक शिंदे,महेश थोरात,अनंत गोडसे, कल्पेश टोरपे, अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कला प्रेमी नागरिक प्रयत्नशील आहेत.दीपावली-पाडवा निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेत जातीत जास्त कला प्रेमिंनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे…
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker