
Samrudhakarjat
4
0
1
8
4
8
राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी :- माननीय खासदार तसेच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राशीन च्या जगदंबा देवी दर्शनासाठी आले असता यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरात जाऊन जगदंबेची ची पूजा आरती करून दर्शन घेतले व इडा पिडा टळु दे बळीराजाचचे सरकार परत येऊ दे व इडी व खोके सरकार महाराष्ट्रात व देशात लवकर पडू दे असे साकडे घालत नवसाला पावणाऱ्या श्री जगदंबा देवी चरणी नतमस्तक होऊन पुढील मराठी पत्रकार परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश भव्य कार्यक्रमासाठी कर्जतच्या दिशेने रवाना झाले
यावेळी मा. सभापती शाम कानगुडे, विजय मोढळे, संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराज सिंह राजे भोसले, माऊली सायकर, इमरान शेख, शुभम बोरा, सागर सुळ, शिवकुमार सायकर ,दादा लोंढे, व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.