आमली पदार्थ विरोधात पोलीस प्रशासनाकडून हशु आडवाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना जनजागृती


राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी:-अमली पदार्थ जनजागृत कार्यक्रमांतर्गत. हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशिन येथे गुरुवार दि. १४/८/२०२५. रोजी राशीन दूरक्षेत्रचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक व पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमा वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. बाळासाहेब मुळीक व क्षीरसागर यांनी केले .व्यसनापासून दूर राहण्याचे धडे दिले तसेच व्यसन करणे किती घातक आहे त्याच्या आहारी जर गेलं तर मृत्यू अटळ आहे अशा भाषेत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले, श्री बाळासाहेब मुळीक यांनी विद्यालयाच्या परिसरातील येणाऱ्या रोड रोमिओनचाही बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर मुलींना जर कोणी त्रास देत असेल तर त्या मुलींनी तक्रार पेटीत आपली तक्रार टाकावी किंवा स्वतः माझ्याशी दूरध्वनीवर किंवा समक्ष संपर्क साधावा त्यानंतर त्यांचा बंदोबस्त मी करतो अशा शब्दात मुलींशी संवाद साधला या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज विकास संस्थेचे अध्यक्ष श्री अल्लाउद्दीन एस काझी साहेब हे होते कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र नष्टे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते साहिल दादा काझी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल काळे सर व प्रा .मुस्ताक शेख सर यांनी केले तर कार्यक्रमाचे शेवटी आभार यशवंत देशमुख सर यांनी मानले*.



