pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
Trending

NEET, JEE आणि MHT-CET मध्ये कोटा मेंटॉर्सचा झळाळता निकाल

Samrudhakarjat
4 7 0 5 9 2

कर्जत (अहिल्यानगर) : येथील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात NEET, JEE, आणि MHT-CET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

या वर्षी NEET परीक्षेमध्ये कुमारी प्रतीक्षा अनारसे हिने 527 गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली, तर साक्षी खेडकर हिने 516 गुण मिळवून आपले स्थान निश्चित केले.

JEE (Advanced) परीक्षेत देखील विद्यालयाने विशेष यश संपादन केले आहे. श्रीकांत कदम याने 99.75 टक्के गुण मिळवून IIT साठी महाराष्ट्रातील पहिल्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले. मिताली पोपळे हिने 99.5 टक्के गुण मिळवून तिची गुणवत्ता सिद्ध केली.

MHT-CET परीक्षेतसुद्धा विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी ठरले. पाडुळे वैष्णवी हिने 95.48%, गायकवाड योगिता – 94.31%, राऊत समर्थ – 94.25%, गंगावणे दीक्षा – 93.00%, मदने संकेत – 92.07%, पोटरे निळकंठ – 91.97%, आणि खिळे मेघराज – 91.30% गुण मिळवून संस्थेच्या यशात भर घातली.

फक्त 25 विद्यार्थ्यांची बॅच असलेल्या कोटा मेंटॉर्स विद्यालयाने गुणवत्तेवर भर देत अत्यंत अल्प संख्येतील विद्यार्थ्यांमधूनही प्रचंड यश संपादन करून एक आदर्श निर्माण केला आहे.

या गौरव समारंभात विद्यार्थी, पालक, शिक्षक, आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker