राशीन मध्ये राजेबागसवार उरूस संदल मोठ्या उत्साहात साजरा.


राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी दरवर्षी सालाबाद प्रमाणे आषाढ महिन्याच्या चौथ्या गुरुवारी राशीन परीटवाडी शिक्षेवर असलेले हजरत राजेबागसवार दर्गेचा ऊरुस मुस्लिम हिंदू बांधवांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचा सलोखा पहावयास मिळाला. सालाबाद नियमाप्रमाणे, काझी गल्ली येथून काझी परिवारांच्या वतीने संदल हजरत राजबागसवार की दोस चारोद्दीन जयघोष करीत वाजत गाजत गुरुवार दिनांक १७/७/२०२५ रोज दुपारी तीन वाजता दर्गा परिसरात पोहोचताच तेथे जमलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात संदल

चे स्वागत केले. त्यानंतर हजरत राजबागसवार दर्गाह यांच्या मजारला(कबर) संदल गुलाब पाण्याने पूजन करून कबरवर काझी परिवार व इतर हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने आलेल्या चादर फुल शेरा कबर वर विधी पूर्वक अर्पण करीत फातिया देण्यात आल्या. याप्रसंगी दर्ग्यावर वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांनी प्रसाद स्वरूपात मोठ्या प्रमाणात गोड शिऱ्याचे वाटप जमलेल्या भाविक भक्तांना केले. यावेळी भाजपा नेते अल्लाउद्दीन काझी, पत्रकार जावेद काझी, मुजावर ताजुद्दीन काझी, साहिल काझी,अल्लाउद्दीन इब्राहिम

काझी,अमोनुला काझी, आताऊल्ला काझी, अरुण काशीद,राजेंद्र साळवे, सलीम शेख, लतीफ पठाण, गवळी सर, विकास साळवे, संतोष गवळी,सद्दाम काझी,राजू तांबोळी, फिरोज तांबोळी, इतर भाविक भक्त व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी साठीजमलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे व महिला भगिनींचे मुजावर ताजुद्दीन काझी यांनी आभार मानले.



