pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कोटा मेन्टोर्स विद्यालय, कर्जत येथे भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शन…

Samrudhakarjat
4 6 1 5 8 9

कर्जत, 6 डिसेंबर 2025 (शनिवार): कोटा मेन्टोर्स विद्यालय, कर्जत येथे आज विज्ञान दिवसानिमित्त भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणित विषयांचे महत्व प्रभावी पद्धतीने मांडत विविध आकर्षक प्रकल्प सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान विषयाचे शिक्षक प्रा. अमोल देवळे सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान आधुनिक समाजात किती महत्त्वाचे आहे याची सखोल माहिती दिली.

विज्ञान विभागातील प्रा. सोनावणे सर, सोनी सर, तिवारी सर तसेच शिक्षिका थोरात मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे तत्त्व, त्यामागील वैज्ञानिक कारणं व त्यांचा उपयोग समजावून सांगितला.

गणित विभागातील ह्रिदेश निरंजन सर,चव्हाण सर व शिक्षिका गुंड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गणिताच्या नव्या संकल्पना, तार्किक विचारशक्ती व समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले.

शाळेच्या प्रिन्सिपल रिकी गुप्ता मॅडम व प्रिन्सिपल विशाल केरूळकर सर यांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक जीवनात विज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून भविष्यात सक्षम नागरिक बनण्याचे आवाहन केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. केशव आजबे सर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विज्ञान व गणित दोन्हीही विषय मुलभूत भूमिका बजावतात, असे सांगून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व शिक्षकांनी समन्वय साधत उत्तम सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान यामुळे प्रदर्शन विशेष आकर्षणाचा विषय ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker