pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कर्जत तालुकाध्यक्षपदी प्रा.सुनील गोरे तर सचिवपदी प्रा. संतोष गलांडे

Samrudhakarjat
4 6 6 1 6 3


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नूतन कार्यकारणीची अधिकृत निवड अहिल्यानगर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मा. शाहूराव औटी सर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यावेळी कर्जत तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुका अध्यक्षपदी प्रा. सुनील गोरे तर सचिव पदी प्रा. संतोष गलांडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी सर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. अमिता कोहली मॅडम, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी सर, पारनेर तालुका सचिव दत्तात्रय औटी सर व कर्जत तालुका ग्राहक पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.


जिल्हाध्यक्ष प्रा. शाहूराव औटी यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.यानिमित्ताने कर्जत तालुक्यातील ग्राहक चळवळीला नवीन दिशा आणि बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्राहक हा प्रत्येक व्यवहाराचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हीच खरी ग्राहक पंचायतची जबाबदारी आहे असे सांगितले तसेच संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणींना आवाज मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कर्जत ग्राहक पंचायत तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी प्रा. सुनील गोरे, सचिव पदी प्रा. संतोष गलांडे, उपाध्यक्षपदी प्रा. रामचंद्र अनारसे, श्री,युवराज गदादे, सहसचिव पदी प्रा. सागर रासकर, श्री, अंबादास जाधव कोषाध्यक्षपदी मा, ओंकार बगाडे तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी पत्रकार विनायक चव्हाण आदींची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. संतोष गलांडे यांनी केले तर आभार ओंकार बगाडे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker