google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून श्रीगोंदा बस डेपोला ५ नवीन बसेस

कर्जत परिसरातील ग्रामस्थ व भाविकांना होणार मोठ्या प्रमाणावर फायदा

Samrudhakarjat
4 9 1 9 6 3

कर्जत – महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून श्रीगोंदा बस डेपोला पाच नवीन बसेस मिळणार आहेत. या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, त्यातील तीन बसेस शेगाव, जळगाव आणि त्र्यंबकेश्वर या महत्त्वाच्या धार्मिक व पर्यटन मार्गांवर धावणार आहेत. भाविकांना प्रवासाची अधिक सोय व्हावी आणि या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे दोन बसेस पॅकेज टूरसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. श्रीगोंदा व कर्जत परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर धार्मिक स्थळांना भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर गटाने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित, परवडणारी आणि सोयीस्कर व्यवस्था व्हावी, या उद्देशाने या बसेस खास उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातून धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना नवी सोय निर्माण होईल, तसेच एमएसआरटीसीच्या प्रवासी सेवेला बळ मिळेल.

कर्जत भाजपा अध्यक्ष अनिल गदादे यांनी माहिती देताना सांगितले की, प्रा. राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच श्रीगोंदा डेपोला या पाच नवीन बसगाड्या मिळाल्या आहेत. त्यांनी पुढे असेही सांगितले की, प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, ग्रामीण भागाशी शहरांचा संपर्क अधिक मजबूत व्हावा आणि धार्मिक पर्यटनाचा विकास व्हावा, या सर्व हेतूंनी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे श्रीगोंदा, कर्जत व आसपासच्या परिसरातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार असून भाविकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

या उपक्रमामुळे केवळ धार्मिक प्रवासालाच चालना मिळणार नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडणाऱ्या नियमित प्रवासी वाहतुकीलाही नवे बळ मिळणार आहे. श्रीगोंदा तालुका, कर्जत तालुका आणि परिसरात बससेवा उपलब्धतेमुळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker