pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

पाटेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Samrudhakarjat
4 6 1 5 8 8

कर्जत (प्रतिनिधी) : – स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटेवाडी येथे दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. संतोष (बापू) भोसले, सरपंच झुंबरराव राजगुरु, योगेश काका भोसले, विरेंद्र कुमार निंबाळकर, संतोष राजे निंबाळकर, सुनील तात्या मोहिते, सविता क्षिरसागर, अशोक डिसले, अमर पाटील, सचिन दळवी, अजित बापू भोसले, धनंजय भोसले, सचिन निंबाळकर, किशोर दळवी, सागर क्षिरसागर, संदीप डिसले, जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रविण दादा घुले पाटील, अशोक काका खेडकर, बाळासाहेब गांगर्डे (वरिष्ठ अधिकारी, पंचायत समिती कर्जत), नवनाथजी अडसुळ (नाशिक विभागीय अध्यक्ष),अशोकराव नेवसे (जिल्हा सचिव, इब्टा संघटना, अहमदनगर), देवराम लगड (माजी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कर्जत), नवनाथ दिवटे (विश्वस्त, प्राथमिक शिक्षक बँक) यांची विशेष उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीत, समूहगायन आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या निरागस सादरीकरणातून आत्मविश्वास, संस्कार व गुणवत्तेची झलक पाहायला मिळाली. पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.

या स्नेहसंमेलनासाठी विशेष सहकार्य करत सरपंच अनिल खराडे (कापरेवाडी) यांनी विद्यार्थ्यांना स्टडी टेबल, शाळेला रंगकाम, पाण्याची टाकी, कार्यालयासाठी टेबल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र जरे, संतोष डहाळे, संतोष सोनवर, म्हेत्रे सर, दत्तात्रय गदादे, नवनाथजी अडसुळ यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच पाटेवाडी शाळेचे मुख्याध्यापक शाम राठोड, सुवर्णा म्हेत्रे मॅडम व कविता बंडगर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून तो यशस्वी केला.

या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच कला, संस्कार व सामाजिक जाणीवेचा विकास होत असल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

एकूणच पाटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला असून, ग्रामस्थ, शिक्षक व मान्यवरांच्या एकत्रित प्रयत्नातून शिक्षणाची गंगा अधिक प्रवाही होत असल्याचे समाधानकारक चित्र यावेळी पाहायला मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker