कर्जत तालुका व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी नागेश खेडकर यांची निवड.


कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या व्यापारी आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी श्री. नागेश उत्तमराव खेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही घोषणा नुकत्याच कर्जत येथे पार पडलेल्या तालुका कार्यकारिणी जाहीर कार्यक्रमात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री इंजि. सुरेश इथापे होते. तर विशेष उपस्थितीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजेश परकाळे व कर्जत तालुका अध्यक्ष शिवश्री वैभव लाळगे उपस्थित होते. कर्जत शहर केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष असलेल्या नागेश खेडकर यांना एकमताने व्यापारी आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री राहुल नवले, मराठा पतसंस्थेचे संचालक शिवश्री कालिदास शिंदे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष शिवश्री शाम जरे, इंजि. रामदास काळदाते, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा शिवमती उज्वला शेळके तसेच सकल मराठा समन्वयक शिवश्री रावसाहेब धांडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीबद्दल तालुक्यातून नागेश खेडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्त्वात व्यापारी आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




