गेली ५१ वर्षा पासून अखंड हरिनाम महात्सव नागेश्वर मंदिर येथे सुरूच

समृध्द कर्जत / प्रतिनिधी :- श्री नागेश्वर मंदिर हे हेमाडपंती साधारण ७५० पुर्वीचे कर्जत येथे आहे कर्जत येथील प्रसिद्ध बागायतदार प्रगतशिल शेतकरी भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष कुशल शेतकरी संघटक कैलास वासी पोपटलाल झुंबरलला बलदोटा यांनी हा उपक्रम ५१ वर्षा पूर्वी सुरू केला मंदिर जीर्णोद्धार सुशोभीकरण व वर्षातून 2 हरिनाम सप्ताह श्रावण व महाशिवरात्री सप्ताह सुरुवातीला 25 वर्ष केले व पुढील 26 वर्ष महाशिवरात्री निर्मित हरिनाम सप्ताह आयोजन सुरूच आहे
कै पोपटलाल बलदोटा नंतर त्याचे चिरंजीव डॉ उदय बलदोटा व सूनबाई सौ जयमाला बलदोटा हे सर्व समाजाच्या व शिवभक्त च्या मदतीने हा सप्ताह अखंड चालू आहे या वर्षी
८/०३/२०२४ शुक्रवार ह भ प अँड नवनाथ भीमराव कदम यांचे प्रवचन व ह भ प श्रीहरी महाराज पुरी यांचे कीर्तन होईल व ९/०३/२०२४ ह भ प श्रीहरी महाराज पुरी यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होईल तरी भाविकांनी या सुवर्ण संधिचा लाभ घ्यावा व मंदिर सुशोभिकरणात सढळ हाताने मदत करावी असे अवाहन आयोजकाचे वतिने करण्यात येत आहे