कोटा मेन्टोर्स विद्यालयाचा तालुका विज्ञान प्रदर्शना मध्ये झळाळता यश


कर्जत – तालुका विज्ञान प्रदर्शनात कोटा मेन्टोर्स विद्यालय, कर्जत येथील विद्यार्थी संस्कार गौतम वाघमोडे (इयत्ता 9 वी ते 12 वी – मोठा गट, गणित विभाग) यांनी द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या उल्लेखनीय यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून शाळेत आनंदाचे वातावरण आहे.
संस्कार वाघमोडे यांना प्रकल्प तयारीपासून सादरीकरणापर्यंत प्रा. अमोल देवळे सर यांचे सतत मार्गदर्शन लाभले. तालुक्यातील राशीन येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात अनेक उत्तम प्रकल्प सादर झाले होते, मात्र उत्कृष्ट मॉडेल, सुस्पष्ट मांडणी आणि प्रभावी सादरीकरण यांच्या जोरावर संस्कार यांनी आपले यश निश्चित केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका रिकी गुप्ता मॅम व विशाल केरूळकर सर तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रा. केशव आजबे सर यांनी संस्कारचे मन:पूर्वक अभिनंदन केले. कोटा मेन्टोर्स विद्यालय हे कर्जत तालुक्यातील एक प्रतिष्ठित व गुणवत्तापूर्ण विद्यालय असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव अग्रभागी असते.
सर्व शिक्षकांनी संस्कारचे अभिनंदन करत जिल्हास्तरावरही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



