राशीन येथील अंबादास जाधव यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी निवड.


राशिन प्रतिनिधी जावेद काझी. राशीन येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अंबादास भगवानराव जाधव यांची सर्वसामान्य जनतेची अल्पशा काळात प्रत्यक्षात केलेल्या कामाची चुणूक व उत्तुंग भरारीची पावती पाहता वरिष्ठांनी अंबादास जाधव यांना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र
दि. 7/11/2025 रोजी मुंबई सेना भवनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बांधकाम कामगार सेना मा. श्री प्रीतम जी धारीया साहेब तसेच कार्याध्यक्ष महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना मा.श्री. संतोषजी रजपूत सरचिटणीस महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना मा. श्री विशाल ढोरे साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत श्री अंबादासजी जाधव यांच्या कामाचे दखल घेऊन व सर्वसामान्य लाभार्थ्यांना सर्व गरजू लोकांच्या योजना निशुल्क पद्धतीने व स्वतः खर्च करून सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला याची दखल घेऊन त्यांना अहिल्यानगर दक्षिण चे जिल्हाप्रमुख पदी नव्याने निवड करण्यात आली आहे. तसेच मातंग समाजाचे युवा नेते श्री महेशजी

किरडे यांना देखील अहिल्यानगर दक्षिणचे सचिव पद देण्यात आले आहे व त्यांना पुढील काळात आणखी जोमाने कामे करण्यास मार्गदर्शन वरिष्ठांचे लाभत आहे. या झालेल्या निवडीबाबत जाधव व उकिरडे यांच्यावर राशीन व पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.




