भाजपा नेते विक्रम राजे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळाचे आयोजन.

राशिन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे दीपावली सणा निमित्त भाऊबीज चे अवचित्य साधत विक्रम राजे राजे भोसले परिवाराकडून मित्रपरिवार व सहस्नेह प्रेमींना घरी फराळासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी राजकीय ,सामाजिक .शैक्षणिक, व इतर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी राजे भोसले परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत पावभाजी, कानवले,
कापण्या चकली व इतर फराळ पदार्थांवर वर चांगलाच ताव मारला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास जी पिसाळ, माजी सरपंच शाहू राजे भोसले, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे ,अशोक जंजिरे, दत्ताआबा गोसावी, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, भाजपा भटके विमुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, दादा परदेशी, संतोष सरोदे, नितीन कानगुडे, उद्योजक भास्कर मोढळे, संजय ढगे, गणेश कदम, शिवसेनेचे सुभाष जाधव, सुनील काळे, देशमुख वाडी चे उपसरपंच मालोजी भिताडे, अजिंक्य राजे भोसले, अमोल शेटे, पत्रकार जावेद काझी, दत्ता उकिरडे, तेजस पंडित, सचिन आडबल, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.