ज्येष्ठ नेते मा.अल्लाउद्दीन काझी साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न….!


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. समाज विकास संस्थेचे , हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मा.अल्लाउद्दीन एस.काझी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राशीनचे मा.सरपंच श्री. शिवदासजी शेटे हे होते.

कार्यक्रम प्रसंगी देशमुखवाडीचे मा.उपसरपंच श्री. मालोजीराजे भिताडे यांनी आपल्या दिलखुलास वक्तृत्वामधून माननीय काझी साहेब यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याविषयी माहिती दिली. अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन त्यांनी शिक्षण संस्था उभारली आणि राशीन सारख्या गावांमध्ये उत्कृष्ट शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानिमित्त त्यांचे आभार मानून त्यांच्या उत्तम आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी यांनी मा.अल्लाउद्दीन काझी यांचा फेटा श्रीफळ देऊन सत्कार केला.याप्रसंगी पत्रकार श्री.महादेवजी सायकर ,युवा नेते श्री. तात्यासाहेब माने, श्री. सोयबकाका काझी, प्रा.अनिल यादव सर
महाराष्ट्र पोलीस श्री. अप्पासाहेब कोळेकर सर , सुनील त्रंबके,उद्योजक जमीर भाई काझी,ज्ञानेश्वर भागवत , विशाल मोहिते, जेके मोटर्स चे संचालक जाकीरभाई काझी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड प्रा.विठ्ठल काळे यांनी केली तर अनुमोदन प्रा.मुस्ताक शेख सर यांनी केले.. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र नष्टे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिगांबर साळवे यांनी केले तर आभार श्री. मनोहर भारती सर यांनी मानले.



