“शंभू ऑईल मिल, मसाले” शाखा क्रमांक .02 भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न


(कर्जत प्रतिनिधी) :- “खात्री शुद्धतेची..!” या घोषवाक्याने ओळख मिळवणाऱ्या शंभू ऑईल मिल, मसाले व दाळी शाखा क्रमांक.02 चा भव्य शुभारंभ सोहळा रविवार दि.05 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता डी.पी. रोड, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, कोथरुड, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन पुणे शहराचे पोलिस उपायुक्त सौ. व श्री. संभाजी कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, तर अध्यक्षस्थान भूषविले होते सौ. व श्री. समीर गायकवाड यांनी. या प्रसंगी मा. आमदार कोथरुड तसेच सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन सौ. व श्री. आतिष सरकाळे हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा देताना “शंभू ऑईल मिल” च्या उत्तम गुणवत्तेच्या आणि शुद्धतेच्या उत्पादानांबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, पुणेकरांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी शुद्ध व नैसर्गिक उत्पादनांची आवश्यकता आहे आणि “शंभू ऑईल मिल, मसाले व दाळी” हा उपक्रम या दिशेने एक आदर्श पाऊल आहे.
या सोहळ्याचे निमंत्रक सौ. व श्री. महेश (दादा) तनपुरे, सौ. व श्री. अॅड. धीरज ढेरे (शिवाजीनगर, पुणे), सौ. व श्री. संतोष (काका) बोराटे पाटील, सौ. व श्री. सुनील (काका) बोराटे पाटील तसेच कर्जत मित्र मंडळ (पुणे ग्रुप), संत गोदड महाराज अन्नछत्र मित्रमंडळ व सेवेकरी मंडळी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या प्रसंगी पुण्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि व्यावसायिक उपस्थित होते शशिकांत (दादा) पाटील, तानाजी पाटील, निखिल आबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, समीर गायकवाड (पुणे), नितीन तोरडमल, प्रदीप मोरे, शरद म्हेत्रे, श, सदाशिव फरांडे, निलेश (बंटी) यादव, , बापू (सर) साळुंके, गणेश वाळुंजकर, गणेश सुद्रीक, , रतन चौधरी, , गणेश कन्हेरे, , विकास भारती, अक्षय गरड, गंगासिंग परदेशी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंभू ऑईल मिलचे सर्व हितचिंतक, मित्रपरिवार आणि पुणेतील उद्योजक वर्ग यांनी एकत्रितपणे परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांना पारंपरिक आदरातिथ्याने सन्मानित करण्यात आले.

🌿 “शुद्धतेची खात्री – आरोग्याचा आधार” या ध्येयवाक्यासह “शंभू ऑईल मिल, मसाले व दाळी” पुणेकरांच्या सेवेत सज्ज झाली असून, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आरोग्यदायी व नैसर्गिक जीवनशैलीचा संदेश देत आहे.
📞 संपर्क : 9503265555
निमंत्रक : शंभू ऑईल मिल, मसाले व दाळी व मित्रपरिवार



