pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशिन मध्ये जातीय सलोखा शांतता अबाधित राहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची सी.ई.ओ.ला विशेष ग्रामसभेची मागणी.

Samrudhakarjat
4 6 2 8 4 8

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशिन ता. कर्जत जि. अहिल्यानगर येथे मागील दोन महिन्यापासून गावामध्ये अशांतता व भीतीचे वातावरण पसरलेले असून स्थानिक गावकरी ग्रामस्थ व व्यापारी वर्ग व छोटे दुकानदार यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्थानिक गावकरी ग्रामस्थांन मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

या भीतीपायी जातीय सलोखा व शांतता अबाधित राहावी यासाठी राशीनचे माजी सरपंच अल्लाउद्दीन काझी व स्थानिक गावकरी ग्रामस्थांच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. राशीन ग्रामपंचायत मध्ये प्रशासक असल्यामुळे प्रशासकाला त्वरित ग्रामसभा घेण्यासाठी सी.ई.ओ. जिल्हा परिषद अहमदनगर यांनी त्वरित विशेष स्थानिक गावकरी ग्रामस्थांची ग्रामसभा घेण्याबाबत लेखी आदेश तात्काळ द्यावा काढावा अशी मागणी, माजी सरपंच अल्लाउद्दीन काझी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने सी.ई.ओ. साहेब जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र प्रत तहसीलदार साहेब कर्जत,गटविकास अधिकारी कर्जत, प्रशासक जगताप साहेब ग्रामपंचायत राशीन, पोलीस स्टेशन कर्जत यांना देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांना ग्रामसभा घेण्याची परवानगी मिळावी अशी मागणी राशीन चे माजी. सरपंच अल्लाउद्दीन काझी व स्थानिक गावकरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker