pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूल मध्ये* *नवागतांचा स्वागत सोहळा आनंदात साजरा

Samrudhakarjat
4 6 1 5 8 7

(समृद्ध कर्जत): – आज दि. ९ जून रोजी न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्षाचा(२०२५- २६) शाळेचा पहिला दिवस नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने पार पडला. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत झाले .विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सोहळ्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच शाळेच्या नियमांबद्दल आणि शैक्षणिक वर्षाच्या योजनांबद्दल माहिती दिली. या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाचे दृश्य विशेष लक्षवेधी ठरले. शाळेच्या प्रवेशद्वारावर सजावट चौकटीत सर्व नवीन विद्यार्थ्यांचे फोटो काढले आणि पहिली ते नववी च्या नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्प, खाऊ आणि फुगे देऊन करण्यात आले. 

          या कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक श्री. संभाजी लांगोरेसाहेब (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहिल्यानगर) यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. किरण नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) यांनी नवीन विद्यार्थ्यांना पुष्प देवून स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. अतिशय आनंदात हा कार्यक्रम पार पडला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker