Advertisement
ब्रेकिंग

कर्जत जामखेड येथील बस स्थानकासाठी आ. रोहीत पवार यांनी ८ कोटी ७१ निधी मंजूर केल्याबद्दल कर्जत तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने यांचे अभिनंदन,

Samrudhakarjat
4 1 3 0 8 1

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत-जामखेडच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कर्जत व जामखेड येथील बस स्थानकासाठी आ. रोहीत पवार यांनी ८ कोटी ७१ निधी मंजूर केल्याबद्दल कर्जत तालुका प्रबासी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व जाहीर आभार मानले आहेत.

यामध्ये कर्जत व जामखेड बेशील बस स्थानकाचे काँक्रीटीकरण व सुलभ शौचालयाचे बांधकाम करणार असून यामुळे शेतकरी, व्यापारी, विदयार्थी व प्रवासी यांची होणारी गैरसोय दुर होणार आहे.

कर्जत-जामखेड मध्ये शालेय विदयार्थ्यांची संख्या लक्षनीय आहे त्याचबरोबर व्यापारी व प्रवासी यांची गैरसोय दुर होणार आहे, यामुळे कर्जत-जामखेड एस.टी. आगाराचे रुप बदलणार आहे व कर्जत-जामखेड येथील बसस्थानक सुंदर होणार आहे. कर्जत-जामखेड या दोन्ही डेपोला जास्तीत जास्त एस.टी. बसेस मिळणार आहे तसेच कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील बसस्थानकाला भरीव निधी मंजूर केला आहे.

यासाठी कर्जत तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राम ढेरे यांनी त्यांचे जाहीर आभार मानून त्यांना धन्यवाद दिले आहेत.

लवकरात लवकर कर्जत तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने आ. रोहीत पवार यांचे अभिनंदन, आभार मानण्याचाही व मोठा जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेणार असल्याची माहिती तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राम ढेरे यांनी सांगीतले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker