google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

जोगेश्वरवाडीच्या संजय म्हस्के यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात निवड

आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात सत्कार; अनेक अपयशांवर मात करत गाठले यश

Samrudhakarjat
4 8 1 5 8 2

(कर्जत, प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील जोगेश्वरवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील युवक संजय बबन म्हस्के यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यशाचे शिखर गाठत सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या सहा वर्षांपासून संजय म्हस्के हे आमदार Rohit Pawar यांच्या कर्जत कार्यालयातील अकाउंटंट विभागात कार्यरत होते. आपल्या कामातील प्रामाणिकपणा, शिस्त, सातत्य आणि समर्पणामुळे त्यांनी सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निवडीबद्दल आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालयातील सहकारी उपस्थित होते.

संजय म्हस्के यांचा यशाचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. पोलीस भरतीसाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र प्रत्येक वेळी अवघ्या एक-दोन गुणांनी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार न मानता सातत्याने मेहनत सुरू ठेवली. अपयशाला यशाची पहिली पायरी मानत त्यांनी जिद्द कायम ठेवली आणि अखेर पोलीस दलात स्थान मिळवण्यात यश मिळवले.

यावेळी आमदार रोहित पवार यांनी संजय म्हस्के यांचे अभिनंदन करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. “सामान्य परिस्थितीतूनही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, याचे संजय म्हस्के हे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या यशातून अनेक युवकांना प्रेरणा मिळेल,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

जोगेश्वरवाडीसह संपूर्ण कर्जत तालुक्यातून संजय म्हस्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सेवेतून समाजहिताचे कार्य घडावे आणि कायदा – सुव्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांचे योगदान लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker