शिलाई मशीनचे आमिष दाखवत राशीन येथे बचत गटातील महिलांची केली फसवणूक.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- स्वयंरोजगाराचे अनिश दाखवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील बचत गटातील तब्बल ४३९ महिलांची चार लाख ८२ हजार ९०० रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिलाई मशीन योजनेच्या नावाखाली प्रत्येक महिलेकडून अकराशे रुपये जमा केले मात्र एकही महिलेला अद्याप मशीन मिळाली नाही याप्रकरणी पंचायत समितीच्या महिला समुदाय व्यक्ती(सी आर पी) सरोज सुभाष सुतार राहणार राशीन यांनी थेट कर्जत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. सरोज सुतार २०१९ पासून( सीआरपी) म्हणून बचत गटांना विविध शासकीय योजनांची माहिती देतात…

याच विश्वासाचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याने बुकिंग साठी पैसे भरा. असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर सुतार व इतर महिलांनी पैसे भरून अनेक महिने उलटून देखील एकही महिलास शिलाई मशीन मिळालेली नाही. पैसे परत मागितल्यास संबंधित व्यक्ती कडून टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी सखोल तपास सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याबाबत पडताळणी सुरू आहे अशी माहिती कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी दिली आहे.



