भीमथडी जत्रेत ‘शंभु ऑईल मिल’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शुद्धतेचा ठसा, आरोग्यदायी उत्पादनांवर ग्राहकांची पसंती...


शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यदायी उत्पादनांची ओळख जपणारी शंभु ऑईल मिल यावर्षीही भीमथडी जत्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर येथे 20 ते 25 डिसेंबर 2025 दरम्यान सुरू असलेल्या या जत्रेत स्टॉल क्रमांक ४८ वर उपलब्ध असलेल्या ऑईल मिलची शुद्ध तेल, मसाले आणि दाळींना पुणेकर ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणारी ही उत्पादने कोणत्याही रासायनिक प्रक्रियेपासून दूर ठेवून तयार केली जातात, हीच त्यांची खासियत असल्याचे संचालक किशोर तनपुरे यांनी सांगितले. शुद्धता, नैसर्गिक चव आणि आरोग्याला लाभदायी असे सर्व निकष पूर्ण करणारी उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस पडत असल्याचेही या ठिकाणी दिसून येत आहे.

जत्रेला दररोज मोठ्या प्रमाणात येणारे नागरिक, महिला मंडळे, तरुणाई तसेच गृहिणींचा विशेष प्रतिसाद मिळत असून, शंभु ऑईल मिलच्या स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळते. काळ्या तिळाचे तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, विविध मसाले, दाळी आणि ग्रामीण संस्कृतीचा सुगंध जपणारी अनेक उत्पादने येथे उपलब्ध आहेत.
“आरोग्य आणि शुद्धतेला प्राधान्य देणाऱ्या सर्वांनी पुढील चार दिवसांत नक्की भेट द्यावी,” असे आवाहन आयोजकांनी केले असून, अजूनही जत्रेला भेट देण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी चार दिवसांचा सुवर्णयोग शिल्लक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 📞 ९५०३२६५५५५ 📞 ९४२०३३९५६६
आरोग्यदायी, शुद्ध आणि नैसर्गिक उत्पादनांचा आनंद घ्यायचा असल्यास स्टॉल क्रमांक ४८ – शंभु ऑईल मिल ला नक्की भेट द्या




