pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षण

कर्जतच्या भूमिपुत्राला पोलीस उप अधीक्षक पदावर पदोन्नती

Samrudhakarjat
4 6 0 8 3 7

कर्जत, ता. ८ ऑगस्ट — कर्जत तालुक्यातील थेरवडी गावचा सुपुत्र राजू पार्वती संभाजी सोनवणे यांनी पोलिस सेवेत उल्लेखनीय कामगिरी करून राज्याच्या अभिमानात भर घातली आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेशान्वये त्यांची पोलीस उप अधीक्षक (DySP) पदावर पदोन्नती झाली असून महाराष्ट्र सायबर सेलमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजू सोनवणे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण थेरवडी येथील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (अॅग्रिकल्चर) पदवी मिळवली.

१९९६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत PSI पदावर निवड झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून मुंबईत पहिली पोस्टिंग मिळाली. त्यांच्या २७ वर्षांच्या सेवेत त्यांनी मुंबईत १३ वर्ष, लाचलुचपत विभागात २ वर्ष, गोंदिया नक्षल प्रभावित भागात ३ वर्ष, नवी मुंबईत ७ वर्ष आणि ठाणे येथे २ वर्षे काम पाहिले. सध्या ते ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते.

गावकऱ्यांसह कर्जत तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या या पदोन्नतीबद्दल आनंद व्यक्त केला असून, ही कर्तृत्वगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker