राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नितीनकुमार कांबळे सन्मानित.


(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील रहिवासी तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील श्री. दिगंबर बागल माध्यमिक विद्यालय, सावडी येथील माध्यमिक शिक्षक नितीनकुमार दिगंबर कांबळे यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ने गौरविण्यात आले आहे.

हा पुरस्कार रीजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तर्फे पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नितीनकुमार कांबळे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली चे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद , सचिव विशाल निकत , भरत पाटील , संजय खटके , यांच्यासह जि. प. प्रा. शाळा, रामवाडी चे मुख्याध्यापक संतोष जगताप हे उपस्थित होते. नितीनकुमार कांबळे यांच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




