pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग
Trending

संगिता प्रकाश शेळके कोरेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपातर्फे निवडणूक लढविणार 

Samrudhakarjat
4 6 5 9 7 0

कोरेगाव व पंचक्रोशीत सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या शेळके कुटुंबातील संगिता प्रकाश शेळके यांची जिल्हा परिषद गटातून प्रबळ दावेदार म्हणून चर्चा सुरू आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रणी भूमिका निभावने आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणे अशी शेळके कुटुंबाची ओळख आहे.

 संगीता शेळके या भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके व नामांकित पैलवान अजित शेळके यांच्या मातोश्री आहेत आणि कोरेगावचे माजी सरपंच युवराज शेळके व पै गणेश शेळके यांच्या चुलती आहेत. त्यांचे पती प्रकाश शेळके यांची ओळख प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत खंदे समर्थक तसेच शब्दनिष्ठ व्यक्तिमत्त्व असून कोरेगाव मध्ये सलग दोन पंचवार्षिक काळात सत्तेमध्ये येण्यासाठी ठाम भूमिका त्यांनी बजावली आहे . त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक कार्याला आणि परिसरातील विकासकामांना गती मिळाली आहे.

यांच्या वतीने प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दोन वर्षे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यांमध्ये हिंद केसरी पै सतपाल यांचे सह अनेक महाराष्ट्र केसरी पैलवानांचा सहभाग राहिला होता. त्यांनी यावर्षी देखील भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे स्थानिक पातळीवर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळत आहे.

महापुरुषांच्या जयंती उत्सवांचेही मोठ्या उत्साहात आयोजन करण्याची परंपरा शेळके कुटुंबाने कायम ठेवली आहे. कोरेगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये त्यांचे नातेसंबंध, सख्खेपणा आणि जनसंपर्क मजबूत असल्याने आगामी निवडणुकीत कोरेगाव जिल्हा परिषद गटात त्यांच नाव प्रबळ दावेदार म्हणून संबोधले जात आहे.

भाजपा तर्फे कोरेगाव जिल्हा परिषद गटात या नावावर शिक्का मोर्तब होण्याची दाट शक्यता आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker