pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
Trending

आमदार रोहित पवार यांची शालेय विद्यार्थ्यांना अनोखी भेट; मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुखकर

Samrudhakarjat
4 6 5 0 1 6

कर्जत (प्रतिनिधी) :- आमदार झाल्यापासून मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये या बाबीकडे विशेष लक्ष घातले. नुकताच मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यानुसार मतदारसंघातील तब्बल १० हजार ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ऍग्रो व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. 

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील तब्बल दहा हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. पर गावाहून वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात काही ठिकाणी एसटीचीही सोय नसते प्रसंगी मिळेल त्या वाहनाने अथवा पायपीट करत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. तसेच सायकल घेऊन देण्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसते. अशा परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो.

हीच गोष्ट लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सायकल देऊन त्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व शाळेत येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात १० हजार शालेय विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या असून पुढील टप्प्यात आणखी विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा मानस आहे, असं सांगण्यात आलं आहे. 

कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवडे यांनी आपल्या सुमधुर वाणीतील गायनाने उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच काही शालेय विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले. 

यावेळी बोलत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिल्याबद्दल तसेच मतदारसंघांत सुरू असलेल्या विविध स्तुत्य कामांबाबत त्यांचं अभिनंदन केलं.

विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच येत्या काळातही अशाच पद्धतीनं विद्यार्थी हिताचे आणखी विविध उपक्रम मतदारसंघात राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, कर्जत नगरपंचायती च्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र गुंड, शहराध्यक्ष सुनील शेलार, राहुल नवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल,  अभय बोरा, नगरसेविका प्रतिभा भैलूमे, ज्योती शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, श्याम कानगुडे, दिपक यादव, सचिन मांडगे, स्वाती पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker